चिखली : चिखली येथे २१ डिसेंबर रोजी एका भाडेकरूने घरमालकिणीवर बलात्कार केला. या प्रकरणी त्या महिलेने सोमवारी चिखली पोलिसात तक्रार दिली. मानलेल्या भावाला घराच्या टेरेसवरील खोलीत भाड्याने राहू दिले. रामहरी वगरे (वय ३१, रा. असंगी, ता. जत, जि. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. रामहरी हा फिर्यादी यांच्या ओळखीचा होता. त्याला त्यांनी भाऊ मानले होते. फिर्यादी यांनी त्याला त्यांच्या घराच्या गच्चीवरील खोली भाड्याने दिली होती. फिर्यादी कामानिमित्त टेरेसवर गेल्या असता आरोपीने त्यांच्याशी गप्पा मारत त्यांच्यासोबत मोबाईलमध्ये फोटो काढले. २१ डिसेंबर रोजी फिर्यादी टेरेसवर गेल्या असताना फिर्यादी या एकट्याच असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने त्यांना टेरेसवरील खोलीत ओढत नेले आणि तुझा नवरा काही बोललाच तर त्याला तेथेच मारून टाकीन असे म्हणून धमकी दिली.
चिखलीत भाडेकरूचा घर मालकिणीवर अत्याचार
Reviewed by ANN news network
on
१/१२/२०२२ ०९:३०:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: