Police e news

कापड दुकानदाराकडे खंडणी मागत दुकान व वाहनांची तोडफोड

पिंपरी : रुपीनगर येथील एका कपड्यांच्या दुकानात काम करणा-याला धमकी देत दोघांनी दरमहा हप्ता देण्याची मागणी केली.सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास रुपीनगर येथील रुबाब मेन्स वेअर येथे हा प्रकार घडला. कामगाराने मालकाला विचारून सांगतो असे म्हटल्यामुळे त्या दोघांनी कोयत्याने दुकानाची आणि दुकानासमोरील दोन वाहनांची तोडफोड केली. रोहन चरणदास लोट (वय २४, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे रुपीनगर येथील रुबाब मेन्स वेअर या कपड्यांच्या दुकानात काम करतात. सोमवारी रात्री अनोळखी दोघेजण दुकानात आले. त्यांच्याकडील कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी यांच्याकडून हप्ता चालू करण्याची मागणी करत दुकानाची तोडफोड करण्याची धमकी दिली. फिर्यादी यांनी मालकाला विचारून सांगतो असे सांगितले असता आरोपींनी दुकानाच्या काउंटर आणि प्रवेशद्वाराच्या काचा फोडून नुकसान केले. त्यांनतर दुकानासमोर पार्क केलेल्या रिक्षा आणि कार अशा दोन वाहनांची देखील तोडफोड करून नुकसान केले.
कापड दुकानदाराकडे खंडणी मागत दुकान व वाहनांची तोडफोड कापड दुकानदाराकडे खंडणी मागत  दुकान व वाहनांची तोडफोड Reviewed by ANN news network on १/१२/२०२२ ०९:३२:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.