Police e news

देहूरोड येथे एटीएम फोडणा-यास अटक

देहूरोड : देहूरोड बाजार येथे असलेले अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणा-या एका तरुणाला मंगळवारी (दि. ४) पहाटे साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी अटक केली. अनिकेत पोपट चव्हाण (वय २२, रा. पारशीचाळ, देहूरोड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई सोपान वालेकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देहूरोड बाजार येथे अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. अनिकेत याने एएटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमे-यांचे नुकसान केले. स्क्रू ड्रायव्हर व हातोडीच्या साह्याने एटीएम मशीनच्या समोरील पत्र्याचा दरवाजा तोडला. त्यानंतर आतील बटनांचे नुकसान केले. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली.
देहूरोड येथे एटीएम फोडणा-यास अटक देहूरोड येथे एटीएम फोडणा-यास अटक Reviewed by ANN news network on १/०६/२०२२ ०९:४३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.