लोणावळा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध निर्बंध लावण्यात आलेले असताना या सर्व नियमांना हरताळ फासत लोणावळ्यातील एका हॉटेल व्यावसायिकाने एका कंपनीच्या रहिवासी कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. या कॉन्फरन्स मध्ये एका हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र जमविले होते. याठिकाणी अनेकांच्या चेहर्यावर मास्क नव्हते तर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. याची माहिती लोणावळा शहर पोलीस ठाण्यात समजल्यानंतर सदर हॉटेल व्यावसायिकावर भादंवी कलम 188/269 व साथरोग नियंत्रण कायदा कलम (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी दिली.
शैलेश शशिकांत आंदुरे (वय 42, हॉटेल ड्रिमलँन्ड व्यवस्थापक, लोणावळा) यांच्यावर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे महाराष्ट्र राज्यात ओमायक्रोन व कोरोना रुग्ण स्फोट झाल्या सारखे वाढत असताना लोणावळा येथील एका रिसॉर्ट हॉटेल मध्ये शासनाच्या आदेशाला हरताळ फासून शेकडो नागरिकांचे सेमिनार जमवलेचा प्रकार घडला आहे. महाराष्ट्र राज्यात तसेच जिल्ह्यातील अनेक पर्यटन केंद्र, मॉल, रेस्टॉरंट यांना कडक निर्बंध लागू असताना एका डायरेक्ट सेल्लिंग कंम्पनी ने कुठलीही परवानगी न घेता शनिवारी रेसिडेन्स प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कॉन्फरन्सची माहिती समजल्यानंतर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रविण गोसावी, नितिन सुर्यवंशी यांनी सदरची कारवाई केली.
कोरोना नियमांना हरताळ फासणार्या लोणावळ्यातील हॉटेल व्यावसायिकावर कारवाई
Reviewed by ANN news network
on
१/०९/२०२२ १२:४४:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: