Police e news

मावसबहीणीच्या पतीकडून महिलेवर अत्याचार

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथे एकाने मावस मेहुणीला थंडपेयातून दारू पाजून तिची छायाचित्रे काढली. ती छायाचित्रे नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देत तिच्यावर एप्रिल 2019 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत वारंवार अत्याचार केला. याप्रकरणी पिडित महिलने शुक्रवारी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिच्या मावसबहीणीच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा पीडित महिलेच्या मावस बहीणीचा पती आहे. त्यने फिर्यादीेला थंडपेयातून दारू पाजून त्याचे फोटो काढले. ते फोटो नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. त्याचा गैरफायदा घेऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मावसबहीणीच्या पतीकडून महिलेवर अत्याचार मावसबहीणीच्या पतीकडून महिलेवर अत्याचार Reviewed by ANN news network on १/०९/२०२२ १२:४१:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.