लोणावळा : लोणावळा शहर पोलिसांनी मंगळवारी पहाटे मुंबई पुणे महामार्गावरून जाणारा एक टेम्पो अडवून त्यातील सुमारे २५ लाख रुपये किमतीचा गुटखा आणि सुगंधी पानमसाला जप्त केला आहे.
लोणावळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांना हैद्राबाद येथून मुंबईस विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधी पान मसाला घेऊन जाणारा एक टेम्पो मुंबई पुणे महामार्गावरून मुंबईकडे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस हवालदार एम.बी गोफणे व अंकुश पवार हे सोमवार सायंकाळ पासूनच महामार्गावर व द्रुतगती मार्गावर नजर ठेवून होते. मध्यरात्रीच्या सुमारास वलवण येथे जुन्या मुंबई पुणे महामार्गावरुन टेम्पो (क्र. एम एच ११ ए एल ७७२३) हा लोणावळ्याच्या दिशेने जात होता.
तो थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात सुमारे २५ लाख रुपयांचा गुटखा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव गणेश पांडुरंग जाधव (वय ३१, रा. गुरसाळे, ता.खटाव, जि. सातारा) असल्याचे सांगितले व टेम्पोतील माल हा हैद्राबाद येथील जब्बी शेख यांचा असून त्यांनी मुंबई येथे ते फोन करून सांगतील त्या ठिकाणी उतरविण्यास सांगितल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी टेम्पोचालक गणेश जाधव याला ताब्यात घेतले असून टेम्पोतील मुद्देमाल जप्त केला आहे.
२५ लाख रुपयांचा गुटखा जप्त; लोणावळा शहर पोलिसांची कारवाई
Reviewed by ANN news network
on
२/०१/२०२२ ०९:३५:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: