Police e news

भोसरीतील खून प्रकरणी ४ आरोपी अटकेत

पिंपरी : धावडेवस्ती भोसरी येथे २७ जानेवारी रोजी दगडाने ठेचून एका तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाचा तपास करणा-या दरोडा विरोधी पथकाने गुन्ह्याची उकल केली असून ४ आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी त्या तरुणाचा खून केल्यानंतर मृतदेह ४० फूट फरफटत नेऊन गॅरेजमध्ये फेकल्याची कबुली दिली आहे. गणेश शिवाजी गडकर (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळ रा. टाका, पो. औसा, ता. जि. लातूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. नामदेव शिवाजी शिंदे (वय २४, धावडे वस्ती, भोसरी. मूळ रा.याकतपुर, ता.औसा, जि. लातूर), भारत उर्फ बारक्या भीमराव आडे (वय २२, रा.धावडे वस्ती, भोसरी),आकाश अशोक सरदार (वय २४, रा. नाणेकरवाडी, चाकण), लक्ष्मण राजू नागोले (रा. धावडे वस्ती, भोसरी) यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार,या गुन्ह्याचा समांतर तपास दरोडा विरोधी पथकाने सुरु केला. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी पोलिसांनीकेली. त्यात काही मुले घटनास्थळी दारू पित असल्याचे दिसून आले. सदगुरुनगर येथे एका सराईत गुन्हेगाराची झडती घेत असताना नामदेव शिंदे हा उशिरापर्यंत झोपलेल्या स्थितीत आढळला. त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या तीन साथीदारांसोबत मिळून गणेश गडकर याचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांना देखील अटक केली आहे. यातील मृत व्यक्ती व आरोपी नामदेव शिंदे हे एकाच जिल्यातील राहणारे आहेत, त्यांच्यामध्ये वाद होता. त्याचा काटा काढण्याच्या उद्देशाने नामदेव शिंदे याने तीन साथीदारांसह कट रचून मृत गणेश गडकर याला २७ जानेवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास जनता गॅरेज येथे बोलावून घेतले होते. त्या ठिकाणी त्यांची पुन्हा वादावादी झाली, त्यानंतर नामदेव शिंदे याने आपल्या तीन साथीदारांच्या सहाय्याने गणेश याला दगडांनी ठेचून ठार मारले.
भोसरीतील खून प्रकरणी ४ आरोपी अटकेत भोसरीतील खून प्रकरणी ४ आरोपी अटकेत Reviewed by ANN news network on २/०२/२०२२ ०९:३७:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.