Police e news

३०० कोटी रुपये मूल्याची बिट्कॉइन्स हडपण्यासाठी पोलिसानेच केले एकाचे अपहरण

पिंपरी : एका व्यक्तीकडे असलेले ३०० कोटी रुपये मूल्याचे आभासी चलन (क्रिप्टोकरन्सी) हडप करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एका पोलिसानेचाअपल्या साथीदारांच्या सहाय्याने त्याव्यक्तीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सूत्रधार दिलीप तुकाराम खंदारे (रा. भोसरी, पुणे. मुळगाव मु.पो.कोनाटी, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) या पोलिसासह सुनिल राम शिंदे.(रा.खारदांडा पश्चिम, मुंबई), वसंत श्यामराव.चव्हाण (रा. नालासोपारा पुर्व, मुंबई), फ्रान्सिस टिमोटी डिसूझा (रा. कल्याण (पश्चिम) जि. ठाणे), मयुर महेंद्र शिर्के (रा.खार पश्चिम, मुंबई), प्रदिप काशिनाथ काटे (रा. दापोडी, पुणे), शिरीष चंद्रकांत खोत (रा. उलवे, नवी मुंबई), संजय ऊर्फ निकी राजेश बंसल (रा. उलवे, नवी मुंबई) यांना अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी प्रसारमाध्यमांना दिली. आरोपींनी विनय सुंदरराव नाईक (रा. ताथवडे) यांचे १४ जानेवारी रोजी ताथवडे येथील एका हॉटेलमधून अपहरण केले होते. याप्रकरणी रफिक अल्लाउद्दीन सय्यद (वय ३८) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सय्यद हे नाईक यांचे मित्र आहेत. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून तात्काळ गुन्हा दाखल करत दोन पथके तयार केली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा करत तांत्रिक विश्लेषण सुरु केले.दरम्यान, पोलिस मागावर असल्याचे समजल्याने नाईक यांना वाकड भागात सोडून आरोपी पसार झाले. वाकड पोलिसांनी आरोपींचा माग काढत मुंबई गाठली. तिथून चार जणांना ताब्यात घेत त्यांनी अपहरणासाठी वापरलेली मोटार जप्त केली. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी प्रदीप काटे आणि दिलीप खंदारे यांच्या सांगण्यावरून राजेश बंसल आणि शिरीष खोत यांच्यासोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. नाईक यांचे अपहरण करून त्यांना अलिबाग येथील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवले आणि त्यांच्याकडे आठ लाख रुपयांची मागणी केली असल्याची कबुली देत आरोपींनी या प्रकरणाचा सूत्रधार दिलीप खंदारे असल्याचे सांगितले. दिलीप खंदारे हा पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत असल्याचे तपासात समोर आले.पोलिसांनी खंदारे याला भोसरी येथून सापळा लावून ताब्यात घेतले. तपासात त्याने साथीदारांसोबत मिळून हा गुन्हा सुनियोजितपणे कट रचून केल्याचे कबूल केले. पोलीस शिपाई दिलीप खंदार (रा. भोसरी, पुणे. मुळगाव मु.पो.कोनाटी, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा)े हा पिंपरी चिंचवड येथील पोलीस मुख्यालयात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे. सध्या तो गैरहजर होता. तो पूर्वी पुणे शहर पोलीस दलात कार्यरत होता. तिथे सायबर गुन्हे विभागात काम करत असताना त्याने सेवाअंतर्गत ऑफीस ऑटोमेशन, सायबर गुन्हे प्रणाली, अॅडव्हान्स सायबर क्राईम इन्व्हेस्टीगेशन टेक्नोलॉजी, बेसिक हार्डवेअर अॅण्ड नेटवर्क इन्फॉर्मेशन, मोबाईल फॉरेन्सिक्स असे कोर्स केले आहेत. तो सायबर क्राईम विभाग पुणे शहर येथे काम करत असताना त्याला विनय नाईक यांच्याकडे ३०० कोटी रुपयांची बिटकॉईन्स असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यानेनाईक यांचे अपहरण करून पैसे उकळण्याचा डाव आखला. मात्र, पोलीस मागावर असल्याचे समजताच या आरोपींनी नाईक यांना वाकड परिसरात सोडून दिले.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे एक) संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे दोन) रामचंद्र घाडगे, सहाय्यक निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक निरीक्षक अभिजीत जाधव, उपनिरीक्षक गणेश तोरगल, सहाय्यक फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस कर्मचारी बापुसाहेब धुमाळ, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, दिपक साबळे, बंदु गिरे, अतिश जाधव, प्रमोद कदम, अतिक शेख, प्रशांत गिलबीले, विक्रांत चव्हाण, कल्पेश पाटील, कौंतेय खराडे, अजय फल्ले, नुतन कोंडे यांच्या पथकाने केली आहे.
३०० कोटी रुपये मूल्याची बिट्कॉइन्स हडपण्यासाठी पोलिसानेच केले एकाचे अपहरण ३०० कोटी रुपये मूल्याची बिट्कॉइन्स हडपण्यासाठी पोलिसानेच केले एकाचे अपहरण Reviewed by ANN news network on २/०२/२०२२ ०९:४०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.