Police e news

व्यापा-यांना फसविणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; 16 लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त! वाकड पोलिसांची धडाकेबाज कारवाई (video)

पिंपरी : ताथवडे येथील एका व्यापार्याजकडून पलंगपोस, चादरी, गाद्या आदी साहित्य बनावट नावाने उधारीवर घेऊन त्याची फसवणूक करणार्याल एका आंतरराज्य टोळीला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकण्यात यश मिळविले असून त्यांच्याकडून 16 लाख 98 हजार 507 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीला जेरबंद करण्यासाठी पोलिसांना गुजराथ, मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तरप्रदेश या राज्यात जाऊन तपास करावा लागला आहे. दापोडी येथे राहणारे व्हिक्टर जॉन पिटर यांचे ताथवडे येथे प्राईम कॉर्पोरेशन नावाचे दुकान आहे. ते पलंगपोस, गाद्या आदी साहित्याचे घाऊक विक्रेते आहेत.ते ’स्लिपशुअर’ या कंपनीचे वितरक आहेत.या घाऊक विक्री व्यवसायात खरेदीदारास 1 महिन्याची उधारी दिली जाते. 18 डिसेंबर 2021 ते 22 जानेवारी 2022 या कालावधीत त्यांच्याकडे एक माणूस आला. त्याने आपली ओळख ’फत्ते ट्रेडिंग’ या व्यवसायाचा मालक राजेश योगेंद्रपाल पुरी अशी करून दिली. त्यानंतर दुसरा एक माणूस व्हिक्टर यांच्याकडे आला. त्याने आपले नाव अंकित जैन असून आपण ए. डी. ट्रेडींग कंपनीचे मालक असल्याचे सांगितले. या दोघांनी सुरुवातीस काही रक्कम देत व्हिक्टर यांचा विश्वास संपादन केला.त्यानंतर त्यांच्या प्राईम कॉर्पोरेशनमधून 11 लाख 59 हजार 285 रुपयांचा माल वेळोवेळी उधारीवर खरेदी केला. आणि पैसे न देता पसार झाले. हे लक्षात येताच व्हिक्टर यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांना दिल्या. मुगळीकर यांनी सहायक पोलीस निरिक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपासपथक स्थापन करून त्यांच्याकडे हे प्रकरण सोपविले. पथकाने तपास करण्यास सुरुवात केली असता या प्रकरणातील संशयित आरोपींनी आपले मोबाईल बंद ठेवल्याचे तसेच त्यांची नावेही खोटी असल्याचे आढळून आले. तरीही चिकाटी न सोडता पोलीस पथकाने तपास केला तेव्हा त्यांना आरोपींचा वावर महू, उत्तरप्रदेश येथे असल्याचे समजले. पोलीस पथकातील पोलीस उपनिरिक्षक दिवटे, सहायक पोलीस फौजदार राजेंद्र काळे,पोलीस हवालदार बंदुगिरे, पोलीस नाईक प्रमोद कदम यांचे एक पथक महू येथे गेले. तेथे तपास केल्यावर आरोपी सुरत येथे असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर तदनंतर सहायक पोलीस निरिक्षक पाटील व पोलीस हवालदार विक्रम कुदळ, पोलीस नाईक विक्रांत चव्हाण यांचे दुसरे पथक तातडीने सुरत, गुजराथ येथे रवाना झाले.त्यांनी या गुन्ह्यातील आरोपी दिपक मुरलीधर पनपालीया (वय 51 वर्षे रा. अभिषेक रेसीडेन्सी, मगोब, सुरत,) अशोककुमार नैनचंद बाफना ऊर्फ अंकीत जैन (रा. प्रतिक्षा रेसीडेन्सी, सारोली, सुरत) यांना ताब्यात घेतले. त्यांनी झाकीर हुसैन ऊर्फ राजेश योगेंद्रपाल हा या गुन्ह्यात सामील असल्याची कबुली दिली. . झाकीर हुसैन हा सेंंघवा, मध्यप्रदेश येथे असल्याची माहीती त्यांच्याकडून मिळाली. त्यामुळे सहायक पोलीस फौजदार राजेंद्र काळे, पोलीस हवालदार बंदुगिरे, पोलीस नाईक प्रमोद कदम, पोलीस शिपाई पाटील यांनी तातडीने तेथे जात जाकिर नुरमोहम्मद हुसैन ऊर्फ राजेश पुरी, (वय 48 वर्षे, रा. सेंधवा, जि. बडवानी, राज्य मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले.त्याच्याकडून 8 लाख 72 हजार 334 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा गुन्हा करताना आरोपींनी त्याची पद्धतशीर आखणी केली होती असे तपासात उघड झाले आहे. या साठी होणारा सर्व खर्च सुरूवातीला झाकीर हुसैन करणार होता. त्याने अशोककुमार बाफना व दिपक पनपालीया यांना होणार्याू नफ्यातील 20 टक्के रक्कम देण्याचे कबूल केले होते. मात्र, त्याने सुरुवातीची गुंतवणूक न केल्याने बाफना आणि पनपालिया हे सुरत येथे आले. व त्यांनी सिरोही, राजस्थान येथील ललीतकुमार तुलशीराम खंडेलवाल याला कटात सहभागी करून घेतले. त्याला होणार्याा नफ्यातील 50 टक्के रक्कम देण्याचे कबूल केले. गुन्ह्याचा कट पार पडल्यानंतर अपहार केलेला माल ठरल्याप्रमाणे विक्रीसाठी ललीतकुमार खंडेलवाल याचेकडे दिला. पोलिसांना हे समजताच त्यांनी सिरोही येथे जाऊन ललितकुमार खंडेलवाल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सिरोही, बालोतरा आणि बरलूत या शहरातून 7 लाख 46 हजार 173 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी 16 लाख 98 हजार 507 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीचा एक साथीदार शाहरुख जानआलम खान, (रा. बालोतरा, जि. बाडमेर, राजस्थान) याचा पोलीस अद्याप शोध घेत आहेत. अशाच प्रकारे ’रिपोज’ कंपनीचे वितरक राजाराम नाथाजी भाटी यांनाही आरोपींनी 8 लाख 8 हजार 147 रुपयांचा फसविले आहे.शहरातील आणखी काही व्यापार्यांाना या टोळीने फसविले आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. हा गुंतागुंतीचा तपास पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, परिमंडळ 2 चे उपायुक्त आनंद भोईटे, वाकड विभागाचेे सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्थ पोलीस निरिक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे- 1) संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे-2) रामचंद्र घाडगे , सहायक पोलीस निरिक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरिक्षक दिवटे, सहायक पोलीस फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार,राजेंद्र काळे, पोलीस हवालदार बापूसाहेब धुमाळ,विक्रम कुदळ,विजय गंभीरे, दिपक साबळे, बंदुगिरे, पोलीस नाईक आतिश जाधव, प्रमोद कदम, विक्रांत चव्हाण, अतिक शेख, प्रशांत गिलबीले, पोलीस शिपाई कल्पेश पाटील, कौंतेय खराडे, अजय फल्ले, नुतन कोडे यांनी केला.
व्यापा-यांना फसविणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; 16 लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त! वाकड पोलिसांची धडाकेबाज कारवाई (video) व्यापा-यांना फसविणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; 16 लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त! वाकड पोलिसांची धडाकेबाज कारवाई (video) Reviewed by ANN news network on ४/०६/२०२२ ०१:२८:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.