Police e news

अमृतसरहून पार्सलमध्ये आलेल्या ९७ तलवारी पिंपरी-चिंचवडमध्ये जप्त (video)

पिंपरी अमृतसरहून पार्सलमध्ये आलेल्या ९७ तलवारी पिंपरी-चिंचवडमध्ये जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दिघी पोलिसांनी चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डीटीडीसी कुरियरच्या गोदामात अमृतसरहून आलेल्या पार्सलमध्ये तलवारीसदृश्य वस्तू असल्याचे कर्मचाऱ्यास दिसून आले. कुरियर कंपनीने तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पार्सल्स ताब्यात घेऊन उघडल्यानंतर त्यात तलवारी असल्याचे आढळून आले. याआधी ३० मार्च रोजी औरंगाबादमध्ये डीटीडीसी कुरिअरम आलेल्या पार्सलमध्ये तलवारी आढळून आल्या होत्या. त्याअनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलिसठाण्यांनी कुरियर व्यावसायिकांना येणाऱ्या पार्सलचे स्कॅनिंग करावे, असे सुचविले होते. त्यानुसार, १ एप्रिल रोजी डीटीडीसी कुरियरच्या दिघी येथील गोदामात  कंपनीचे व्हिजिलन्स ऑफिसर रणजीतकुमार सिंग पार्सल्सची तपासणी करत होते. त्यावेळी त्यांना अमृतसरहून पाठविण्यात आलेल्या दोन खोक्यांमध्ये तलवारी सदृश्य वस्तू असल्याचे जाणवले. त्यांनी या प्रकाराची खबर तात्काळ दिघी पोलिसांना  दिली. पोलिसांनी हे खोके उघडून पाहिले असता त्यात तलवारी असल्याचे दिसून आले. हे खोके उमेश सूद, (अमृतसर, पंजाब) या व्यक्तीने औरंगाबाद येथील अनिल होन नावाच्या व्यक्तीस पाठविले होते. दरम्यान, रणजितकुमार सिंग एप्रिल रोजी पार्सल्सची तपासणी करत असताना अमृतसरहन आलेल्या आणखी एका पार्सलमध्ये तलवारी असल्याचा संशय आला. त्यांनी तात्काळ या घटनेचीही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ते पार्सल ताब्यात घेऊन उघडले असता त्यात ५ तलवारी असल्याचे आढळून आले हे पार्सल अमृतसरहून मणींदर (अमृतसर, पंजाब) याने आकाश पाटील (मु.पो. चितळी, ता. राहता, जि. अहमदनगर) याच्या नावे पाठविले होते. हे दोन्ही पार्सल पाठविणारे आणि ज्यांच्या नावे पार्सल पाठविण्यात आले आहे ते दोघे अशा चौघांवर दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
अमृतसरहून पार्सलमध्ये आलेल्या ९७ तलवारी पिंपरी-चिंचवडमध्ये जप्त (video) अमृतसरहून पार्सलमध्ये आलेल्या ९७ तलवारी पिंपरी-चिंचवडमध्ये जप्त (video) Reviewed by ANN news network on ४/०६/२०२२ ०१:२५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.