Police e news

क्रिकेट सामन्यांवर ‘बेटिंग’ घेणाऱ्यांवर कारवाई; २७ लाख जप्त

पिंपरी : काळेवाडी परिसरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सुरू असणाऱ्या ‘बेटिंग’वर गुंडविरोधी पथकाने छापा मारून 27 लाख 25 हजार रुपये, आठ मोबाईल, बेटिंगसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने आणि त्यांच्या पथकाने छापा मारला. पोलीस कारवाई करत असताना यातील आरोपी सनी उर्फ भूपेंद्रसिंह गिल (38, रा. राजवाडेनगर, काळेवाडी) याने सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी या प्रकरणी वेगळा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी हजरतअली पठाण यांनी फिर्याद दिली असून सनी गिल, रिकी राजेश खेमनानी (36, पिंपरी), सुभाष रामकिसन आगरवाल (57, रा. पिंपरी) या तिघांना अटक केली आहे तर सनी सुखेजा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातील सनी गिल हा गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आयपीएलच्या या सिझिनमध्ये शहरात पहिलीच मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे. कारवाईनंतर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर हे घटनास्थळी पोहचले.
क्रिकेट सामन्यांवर ‘बेटिंग’ घेणाऱ्यांवर कारवाई; २७ लाख जप्त क्रिकेट सामन्यांवर ‘बेटिंग’ घेणाऱ्यांवर कारवाई; २७ लाख जप्त Reviewed by ANN news network on ४/०३/२०२२ ११:०४:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.