Police e news

नाशिकफाटा येथे टँकरचा अपघात (video)

पिंपरी : नाशिकफाटा येथील भोसरी मेट्रो स्टेशनखाली उभ्या असलेल्या क्रेनवर मंगळवारी पहाटे एक टँकर आदळून अपघात झाला. सुदैवाने यात प्राणहानी झालेली नाही. हा टँकर मुंबईहून हैद्राबाद येथे द्रवरूप अमोनिया घेऊन जात होता. अचानक आडव्या आलेल्या रिक्षाला वाचविण्याच्या प्रयत्नात टँकरचालक असताना त्याचा ताबा सुटल्याने तेथे बाजूस उभ्या असलेल्या क्रेनला टँकरला धडक दिली. त्यामुळे टँकरचा स्टिअरींग रॉड तुटला आणि तो रस्त्याच्या बाजूस असलेल्या झाडावर जाऊन आदळला. ही धडक एव्हढी जोरदार होती की, झाड मुळासकट उन्मळून पडले. टेँकरचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या क्रेनवर टँकर आदळला ती मेट्रोच्या खांबांना रंग देण्यासाठी वापरली जात होती.
नाशिकफाटा येथे टँकरचा अपघात (video) नाशिकफाटा येथे टँकरचा अपघात (video) Reviewed by ANN news network on ४/०६/२०२२ ०१:२३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.