पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील एका ’स्पा आणि वेलनेस सेंटर’ मध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा पथकाने १ एप्रिल रोजी छापा घातला. त्यावेळी तेथे एकूण ४ मुली देहविक्रय करत असल्याचे आढळले.’स्पा’ च्या मालकिणीला आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. रोख रक्कम, कंडोम पाकिटे आणि मोबाईल्स असा एकूण १० हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शॉप नं १७/५/१ साई सागर प्लाझा, औंघ रावेत बीआरटी रोड, साई चौक, जगताप डेअरी पिंपळे सौदागर, पुणे या पत्त्यावर असलेल्या कॆसल स्पा ऎन्ड वेलनेस सेंटरवर हा छापा घालण्यात आला. सिमा दिपक धोत्रे (वय ३५ वर्षे, ओटा नं ८७, F गोखलेनगर, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे शिवप्रतिष्ठान गल्ली नं १ फेमस चौक, नवी सांगवी, पुणे) असे मालकिणीचे नाव असून पोलीस तिच्या शोधात आहेत. तर, स्पा मॅनेजर आलीम उद्दीन अब्दुल समद, (वय २५ वर्षे, रा. वडगाव शेरी रोड, विमाननगर, पुणे मुळगाव ११६ बेरबेरी रोड, जामा मस्जिद जवळ, जमुनामुख ता होजाई जि नागाव राज्य आसाम पिनकोड ७८२४२८) याला अटक करण्यात आली आहे.
आरोपींविरुद्ध वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुरनं १४७/२०२२ भादवि कलम ३७० (३). ३४ सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३.४.५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे),डॉ. काकासाहेब डोळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, डॉ. अशोक डोंगरे, प्रदिपसिंग सिसोदे, किशोर पढेर, कल्याण महानोर, संतोष बर्गे, सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, मोहिनी थोपटे, सुधा टोके, रेशमा झावरे, भगवान मुठे, गणेश कारोटे, राजेश कोकाटे, सचिन गोनटे, जालिंदर गारे यांनी केली आहे.
Pimple Saudagar : कॆसल स्पा ऎन्ड वेलनेस सेंटरवर छापा Video
Reviewed by ANN news network
on
४/०२/२०२२ १२:३५:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: