Police e news

संकलित गुन्हे वृत्त दि.18 सप्टेंबर 2022

विवाहितेची आत्महत्या भोसरी : बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी येथे बुधवारी पतीच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. अंजूषा आकाश पुट्टे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील संजीवकुमार मोहनराव वल्लापे (वय 47, रा. कर्नाटक) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यावरून मृत विवाहितेचा पती आकाश चंद्रकांत पुट्टे (वय 26, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) याला अटक करण्यात आली आहे. फिर्यादीच्या मुलीचा आरोपीसोबत विवाह झाला होता. विवाहास 6 महिने झाल्यानंतर आकाश याने अंजूषाला त्रास देण्यास सुरुवात केली. तो दारू पिऊन वारंवार तिला मारहाण करत असे. या त्रासाला कंटाळून अंजूषाने बुधवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ---------------------------------- मोटारचालकाला लुटले हिंजवडी : मुंबई बंगळुरू महामार्गावर बाणेर येथे रविवारी दुचाकीवरील दोघांनी एका मोटारचालकाला मोटारीचा धक्का लागल्याचे भासवून लुटले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी पराग प्रकाश रस्तोगी (वय 47 रा. ताथवडे) यांनी तक्रार दिली असून साहिल संजय मराठे (वय 21 रा.मुळशी) व हर्षल सुनिल गोळे (वय 20 रा. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. फिर्यादी मोटारीतून जात असताना आरोपी नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून फिर्यादीजवळ आले व त्यांनी तुझ्यामुळे माझ्या पायाला लागले, माझा मोबाईल पण खाली पडून बंद पडला, तू आमच्या गाडीला डॅश मारली असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण करून त्यांनी फिर्यादीकडील 7 हजार रुपये जबरदस्ती काढून घेतले. ---------------------- मारहाण करून मोबाईल लांबवले पिंपरी : नेहरुनगर, पिंपरी येथे शनिवारी पहाटे तीन ते चार जणांच्या टोळक्याने घरात घुसून मारहाण करून दोघांचे मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी गोविंद गुमान विश्वकर्मा (वय 35 रा.नेहरुनगर) यांनी फिर्याद दिली असून सुमंत गडकर (वय 19 रा. नेहरुनगर) व त्याचे तीन साथीदार यांच्यावर गुन्ह दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या राहत्या घरात जबरदस्तीने घुसून आरोपींनी फिर्यादी काम करत असलेल्या लोटस कोर्ट ह़ॉटेलमधील त्याच्या सहकार्‍यांना आणि त्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीचे सहकारी रुप मुकान सिंग व राजेंद्र दुर्गा थापा यांचे दोन मोबाईल हिसकावून नेले. ---------------------------- कामशेत येथे किराणामालाचे गोदाम फोडले कामशेत : कामशेत येथे एका किराणामालाचे गोदाम फोडून अज्ञात चोरट्यांनी अडीचलाखांचा किराणामाल चोरून नेला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी विशाल गोपाळ भानुसघरे (वय 30 रा. शिलाटणे, मावळ) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचा कामशेत येथे श्री साई एजन्सी नावाने किराणामालाचा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या गोदामात गुरुवारी रात्री खिडकीची संरक्षक जाळी तोडून अज्ञात चोरट्यांनीाअतील तेल, तांदूळ आणि रोख रक्कम 8 हजार 700 असा एकूण 2 लाख 67 हजार 808 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ------------------- महिलेची ऑनलाईन फसवणूक रावेत : रावेत येथील एका महिलेला क्रेडिट कार्ड केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने तिच्या कार्डची माहिती घेऊन तिच्या क्रेडिटकार्डवरून 17 हजार 500 रुपये काढून घेण्यात आले आहेत. ही घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी त्या महिलेने रोहित शर्मा नावाच्या व्यक्ती विरोधात रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी आरोपीने फिर्यादला कॉल केला आणि तिच्या क्रेडिट कार्डचे केवायसी अपडेट करावयाचे असल्याचे सांगितले.त्यासाठी तिला मोबाईलवर एक लिंक पाठवली आणि त्यात क्रेडिट कार्डची सर्व माहिती भरण्यास सांगितले. महिलेने माहिती भरली असता आरोपीने महिलेच्या क्रेडिट कार्डवरून 17 हजार 500 रुपये काढून घेतले. -------------------------- बांधकामस्थळावरून वातानुकुलन यंत्रांची चोरी हिंजवडी : हिंजवडी येथे बांधकामस्थळावरून 6 वातानुकुलन यंत्रे चोरीस गेल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी किरण स्वरूप साळुंके (वय 35 रा. मुंढवा चौक, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी एआरपी या बांधकामस्थळावर क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी म्हणून काम असून तेथे संजीव मोरे हा सुरक्षा रक्षक कामावर होता. . शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास मोरे अंघोळीसाठी गेला असता बांधकामस्थळावरील कार्यालयात ठेवलेले 1 लाख 80 हजार रुपये किमतीची सहा वातानुकुलन यंत्रे चोरीस गेली. ----------------------- मोटारीतून रोख रक्कम लांबवली शिरगाव : लोढा बेलमेंडो,सोसायटी, गहुंजे या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या मोटारीतून शनिवारी सकाळी 1 लाख 56 हजार 500 रुपये चोरीस गेले. या प्रकरणी प्रवीणकुमार सुरेंद्रकुमार सिंग (वय 42, रा. लोढा बेलमेंडो, गहुंजे) यांनी याप्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने त्याची मर्सिडीज मोटार (एमएच 14/जीक्यू 2107) सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.मोटारीत 2 लाख 10 हजार रुपये रोख होते. त्यापैकी 1 लाख 56 हजार 500 रुपये शुक्रवारी रात्री साडेआठ ते शनिवारी सकाळी दहा या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. मोटार धुणारा करणारा ऋषी झाडे, मोटारचालक अविनाश डांगी आणि विश्वनाथ कांबळे यांच्यावर फियादीने संशय व्यक्त केला आहे. ------------------------------ बांधकाम व्यावसायिकांनी फसविले भोसरी : एमआयडीसी, भोसरी येथील स्वस्तिक इंडस्ट्रिअल कॉम्प्लेक्स, येथे गाळे खरेदी केलेल्या व्यक्तीने बांधकाम व्यावसायिकांनी ठरल्याप्रमाणे बांधकाम करून न देता तसेच खरेदीखत करून न देता फसवणूक केल्याबाबत एमआयडीसी, भोसरी पोलीसठाण्यात बांधकाम व्यावसायिकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.त्यावरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश नारायण हारके (वय 41, रा. मोशी प्राधिकरण) असे तक्रारदाराचे नाव आहे. मे. राजमाता प्रमोटर्स तर्फे विकसक हितेश जवाहर जेठानी आणि भागीदार जवाहर हिरालाल जेठानी (दोघे रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार 28 जून 2012 ते 17 सप्टेंबर 2022 या कालावधीत घडला. फिर्यादींने स्वस्तिक इंडस्ट्रिअल कॉम्प्लेक्समध्ये दोन गाळे घेतले होते. त्याचे 46 लाख रुपये आरोपींना दिले. पैसे घेऊनही आरोपींनी खरेदीखत करून दिले नाही. दोन्ही गाळ्यांचे रितसर भोगवटा प्रमाणपत्र न देता ताबा दिला. प्राधिकरणाच्या मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम केले नाही. इमारतीमधील कॉमन पार्किंग, मोकळ्या सामायिक जागा या वेगवेगळ्या गाळाधारकांना ओपन स्पेस दाखवून त्याची स्वतंत्रपणे विक्री केली. सोसायटी स्थापन करण्यासाठी दिलेल्या दोन लाख रुपयांचा हिशोब दिला नाही. कॉमन लाईट मीटर फिर्यादी यांच्या गाळ्याचा असल्याचे दाखवले. पिण्याचे पाणी, अग्निशमन व्यवस्था उभारली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. --------------------------
संकलित गुन्हे वृत्त दि.18 सप्टेंबर 2022 संकलित गुन्हे वृत्त दि.18 सप्टेंबर 2022 Reviewed by ANN news network on ९/१८/२०२२ ०३:०३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.