तडीपार गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर कुत्रा सोडला; कुत्रा चावल्याने पोलिस जखमी
तडीपार गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर कुत्रा सोडला; कुत्रा चावल्याने पोलिस जखमी
वाकड : म्हातोबानगर, वाकड येथे शनिवारी दुपारी तडीपार आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर आरोपीच्या भावाने कुत्रा सोडला.कुत्रा पोलिसाला चावला. या गोंधळात आरोपी पसार झाला. पोलिसांनी आता त्याच्या भावाला अटक केली आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप शेलार याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून रवींद्र प्रकाश घाडगे (वय 24, रा. म्हातोबानगर, वाकड), सागर प्रकाश घाडगे (वय 27, रा. म्हातोबानगर, वाकड), अशोक तुपेरे (रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, पोलीस नाईक संदीप पाटील असे कुत्रा चावलेल्या पोलिसाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी रवींद्र घाडगे याला पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. या आदेशाचा भंग करीत तो शहरात आला असून त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.पथकातील पोलीस हवालदार प्रदीप शेलार आणि पोलीस नाईक संदीप पाटील आरोपीच्या घरी गेले.
आरोपी रवींद्र घाडगे याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 20 हजार 250 रुपये किंमतीचा 810 ग्रॅम गांजा, 1 हजार 700 रुपये रोख रक्कम, 20 हजारांचा मोबाईल फोन असा 41 हजार 950 रुपयांचा ऐवज आढळला. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने हा गांजा अशोक तुपेरे याच्याकडून आणला असल्याचे सांगितले. त्यावेळी रवींद्र याचा भाऊ सागर हा पोलिसांच्या अंगावर धावून गेला. माझ्या भावाला सोडा, तुमचा काय संबंध. एकेकाला बघून घेतो असे म्हणत त्याने त्याचा कुत्रा पोलिसांच्या अंगावर सोडला. कुत्र्याने पोलिसांवर हल्ला केला. पोलीस नाईक संदीप पाटील यांच्या पायाला कुत्र्याने चावा घेतल्याने ते जखमी झाले. या गडबडीत आरोपी सागर हा तिथून पसार झाला. रवींद्र घाडगे याला पोलिसांनी अटक केली.
-------------------------
तडीपार गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर कुत्रा सोडला; कुत्रा चावल्याने पोलिस जखमी
Reviewed by ANN news network
on
९/१८/२०२२ ०४:२५:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/१८/२०२२ ०४:२५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: