Police e news

गाय वासरू कत्तलीसाठी चोरून नेण्याचा प्रयत्न; वासराचा मृत्यू

गायवासरू कत्तलीसाठी चोरून नेण्याचा प्रयत्न वासराचा मृत्यू
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात गुंगीचे औषध देऊन भटकी गुरे चोरून नेणारीटोळी सक्रीय झाली असून पोलीसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकातून होत आहे. यापूर्वीही भोसरीतून एका बैलाला गुंगीचे इंजेक्षन देऊन कत्तलीसाठी पळवून नेण्यात आले होते. त्याविरोधात पोलिसांने तक्रार नोंदविली होती. हे प्रकरण ताजे असतानाच हा प्रकार घडल्याने शहरातील पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. शनिवारी शहरातील सुदर्शन चौक येथे भुलीचे इंजेक्शन देऊन स्विफ्ट डिझायर मोटारीतून गाय वासराला पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, परिसरातीलप्रदिप खराडे, गणेश मंजाळ व अक्षय खंडागळे यांच्यासह अन्य गोरक्षक वेळीच घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे हा प्रयत्न असफल ठरला. वासराला भुलीच्या इंजेक्शनची मात्रा जास्त झाल्याने त्याची स्थिती गंभीर होती त्यामुळे मानद पशुकल्याण अधिकारी अभिजित चव्हाण आणि पालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी अरूण दगडे यांच्याशी गोरक्षकांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याने त्या वासराचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त गोरक्षकांनी पालिकेच्या गेटसमोर मृत वासराला ठेऊन आंदोलन केले. या आंदोलनामध्ये विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री अभिजीत शिंदे, मानद पशु कल्याण अधिकारी अभिजीत चव्हाण, अमित कुदळे, गणेश मंजाळ, प्रतीक खराडे, दीपक मुंगसे, नितीन कुदळे, विठ्ठल जाधव, मंगेश नढे, ऋषी ढाकणे, महेश आढाव हे गोरक्षक उपस्थित होते. या प्रकारानंतर शहरातील गोरक्षकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. पोलिसांचा नाकर्तेपण आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांचा कामचुकारपणा या प्रकाराला कारणीभूत असल्याचा आरोप गोरक्षकांनी केला आहे. मंगळवारी महापालिका मुख्यालयावर या प्रकरणी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे समजते.
गाय वासरू कत्तलीसाठी चोरून नेण्याचा प्रयत्न; वासराचा मृत्यू गाय वासरू कत्तलीसाठी चोरून नेण्याचा प्रयत्न; वासराचा मृत्यू Reviewed by ANN news network on ९/१८/२०२२ ०३:००:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.