महिलेचा विनयभंग; दोघे अटकेत
आळंदी : आळंदी वडगाव रस्त्यावर शुक्रवारी रात्री पाऊस आला म्हणून दुचाकी थांबवून रेनकोट घालत असलेल्या महिलेचा दोघांनी विनयभंग केला. तसेच तिच्या भाच्यावर कोयत्याने वार केला.
या प्रकरणी त्या महिलेने महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यावरून दिलीप बाबुराव हांगे (वय 19, रा. वडगाव रोड, आळंदी), अर्जुन भाऊराव सूर्यवंशी (वय 19, रा. चाळीस फुटी रोड, आळंदी) यांना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी दुचाकीवरून आळंदी-वडगाव रस्त्याने जात असताना पाऊस आल्याने ती ज्ञानसागर मंगल कार्यालयाजवळ थांबली. दुचाकीच्याा डिकीतून रेनकोट काढत असताना तिथे आलेल्या आरोपींनी फिर्यादीशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. फिर्यादींने तिचा भाचा राजेश शिंदे याला बोलावून घेतले. राजेश याने आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी राजेशवर कोयत्याने वार केला.
----------------------
भोसरी येथे घरफोडी
भोसरी : दिघी रोड, भोसरी येथे बंद घर फोडून चोरट्यांनी तीन लाख 70 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. ही घटना शनिवारी दुपारी दीड ते रविवारी पहाटे सव्वापाच या कालावधीत घडली.
कुंडलिक बबनराव पिंपरकर (वय 54, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शनिवारी दुपारी त्याच्या गावी गेला होता. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. 1 लाख 34 हजारांचे सोन्याचे दागिने, 16 हजारांचे चांदीचे दागिने, 2 लाख 20 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 3 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. .
---------------------------
घरात घुसून मारझोड
चिखली : जाधववाडी, चिखली येथे रविवारी सायंकाळी चौघांनी घरात घुसून एका वृद्धासह त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना मारहाण केली. त्याच्या मुलीला आणि जावयाला ठार मारण्याची धमकीही दिली.
या प्रकरणी सुरेश मारुती दळवी (वय 65, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून राजेश जांभुळकर (रा.जाधववाडी, चिखली) आणि तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी फिर्यादीच्या घरात आले. तुम्ही माझ्या मुलीचे वाटोळे केलें आहे, असे बोलून आरोपी राजेश याने फिर्यादीची कॉलर पकडून त्याला ढकलून द्सिले आणि लोखंडी सळईने डोक्यात फटका मारला.त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली. फिर्यादींच्या मुलीला आणि जावयाला ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली.
-----------------------
घरात घुसून तोडफोड
तळेगाव दाभाडे : यशवंतनगर, तळेगाव दाभाडे येथे रविवारी सायंकाळी तिघांनी एका घरात प्रवेश करत त्या घरात एकट्या असलेल्या महिलेला तिचा मुलगा कुठे आहे असे विचारत त्याला जीवंत न सोडण्याची धमकी दिली. आणि, घरातील चिजवस्तूंची मोडतोड केली.
अनिल सुभाष होतकर (वय 23, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून सुशांत सुतार (वय 24), सागर जांभूळकर (वय 22, दोघे रा. जांभूळगाव, ता. मावळ) आणि त्यांचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादींची आई एकटी घरात असताना आरोपी घरात आले. अनिल कुठे आहे, आम्ही त्याला आज जीवंत सोडणार नाही, असे म्हणून आरोपींनी बांबूने घरातील टीव्ही, खिडकीची काच फोडून नुकसान केले. आणि शिवीगाळ करून निघून गेले.
--------------------------
----------
संकलित गुन्हे वृत्त दि.19 सप्टेंबर 2022
Reviewed by ANN news network
on
९/१९/२०२२ ०२:१५:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: