लोणावळा येथे चोरट्याने बंगल्यात शिरून 92 हजारांचा ऐवज लांबवला
लोणावळा : न्यू तुंगार्ली, गोल्ड व्हॅली, सेक्टर सी मधील एका बंगल्यातून शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अज्ञात चोरट्याने 92 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. चोरट्याने गॅलरीतून बेडरूममध्ये प्रवेश करून चोरी केली.
या प्रकरणी सर्वम सौरभ बन्सल (वय,34, रा. ए 703 मानवस्थळ, मिलिटरी रोड, मरोळ, अंधेरी मुंबई) यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून त्यावरून अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बंगल्याच्या पाठीमागील पत्र्यावरून पहिल्या मजल्यावरील बेडरुमच्या गॅलरीत चोरट्याने प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममध्ये जाऊन एक अॅपल कंपनीचा लॅपटॉप, मनगटी घडयाळ,20 हजार रुपये रोख, अॅपल कंपनीचा हेडफोन, फिर्यादीच्या पत्नीचे ड्रायव्हींग लायसन्स, मित्राच्या मालकीचे मनगटी घडयाळ,मित्राच्या मालकीचा अॅपल कंपनीचा एअरपॉड, पॅनकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स,अन्य मित्राच्या मालकीचा हेडफोन व आधारकार्ड असा एकूण 92 हजाराचा ऐवज चोरून नेला आहे.
चोरटा 25 ते 30 वर्षे वयाचा असावा, त्याने रेनकोट घातला होता आणि मास्कही लावला होता असे तक्रारीत म्हटले आहे.
या गुन्ह्याचा तपास निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार उंडे करत आहेत.
लोणावळा येथे चोरट्याने बंगल्यात शिरून 92 हजारांचा ऐवज लांबवला
Reviewed by ANN news network
on
९/१९/२०२२ ०२:१७:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: