नातेवाईकांनी दाम्पत्याला घराबाहेर काढले
आळंदी : आळंदी येथे पोलीस ठाण्याच्या जवळच राहणार्या एका जोडप्याला आमच्या घरात हायचे नाही असे म्हणून त्यांच्याच कुटुंबियांनी सोमवारी घराबाहेर काढले.
या प्रकरणी महिलेने आळंदी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून पोलिसांनी त्या महिलेचे सासरे, दोन दीर व दोन महिला आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी फिर्यादीला तू व तुझ्या नवर्याने घरात रहायचे नाही, म्हणत शिवीगाळ करत घरातील बाथरूम वापरण्यास मनाई केली. तसेच, शिवीगाळ केली. यावेळी हे माझे देखील घर आहे मी जाणार नाही असा विरोध फिर्यादीने केला असता आरोपींनी तिला मारहाण केली. त्यामुळे फिर्यादीने पोलिसात तक्रार दिली.तेथून फिर्यादी घरी आली असता सासर्याने घराला कुलूप लावून घराचा ताबा घेतला. घरातील सामान घेण्यासाठी आल्यास सामान घराबाहेर फेकून देईन आणि तुला स्थानिक गुंडाकडून मार बसवेन अशी धमकी दिली.
---------------------------------
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक
हिंजवडी : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवून नंतर खालच्या जातीची असल्याचे कारण दाखवून लग्नास नकार देणारा तरुण आणि त्याच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात त्या तरुणीने हिंजवडी पोलीसठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून ऋषिकेश चंद्रकांत इगवे (वय 24 रा.मूळ बीड), त्याचे वडील चंद्रकांत इगवे (वय 50) व आई यांच्यावर गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबध ठेवले. तसेच तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. पीडितेने लग्नाचा तगादा लावला असता आरोपीच्या आईवडिलांनी ती खालच्या जातीची असल्याचे कारण दाखवून लग्नाला नकार दिला.
-----------------------------
महिलेला मारहाण
हिंजवडी : बावधन येथे रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास सहा जणांनी एका महिलेला मारहाण केली.
त्या महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून प्रतिक कांबळे, चार महिला आरोपी व अनिकेत वाळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापैकी प्रतिक कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादीच्या मुलांनी प्रतिक याला मारहाण केली होती. याचा राग मनात धरून प्रतिक याने त्याच्या घरच्यांसह फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण केली.
---------------------------
संकलित गुन्हे वृत्त दि.20 सप्टेंबर 2022
Reviewed by ANN news network
on
९/२०/२०२२ ०५:१६:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: