महिला पोलिसाचा डेंग्यूने मृत्यू
बारामती : बारामती शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिसाचा सोमवारी डेेंंग्यूने मृत्यू झाला. दहा दिवसांपूर्वीच या महिलेने एका बालकाला जन्म दिला होता.
शितल जगताप गलांडे असे या महिला पोलिसाचे नाव आहे. त्यांच्यावर पुण्यातील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मागील काही महिन्यांपासून त्या बाळंतपणाच्या रजेवर होत्या. दहा दिवसांपूर्वी त्यांनी एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्यांना डेंग्यूची लागण झाली. अधिक उपचारासाठी त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
महिला पोलिसाचा डेंग्यूने मृत्यू
Reviewed by ANN news network
on
९/२०/२०२२ ०१:३३:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: