कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू
महाळुंगे : तळेगाव-चाकण रस्त्यावर म्हाळुंगे येथे सोमवारी रात्री कंटेनरने मागून दिलेल्या धडकेमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
अभिमन्यू केशव प्रधान (वय 36, रा. लांडेवाडी, भोसरी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी रामेश्वर अच्युतराव हळदे (वय 51, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. त्यावरून कंटेनर चालक भुलन सितलाप्रसाद बिंद (वय 42, रा. नवी मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाळुंगे येथील के. के. एंटरप्रायझेस या कंपनीत कामकरणारे फिर्यादी हळदे आणि मृत अभिमन्यू प्रधान सोमवारी रात्री ते दुचाकीवरून घरी जात होते. आरोपीने त्याच्या ताब्यातील कंटेनर जोरात चालवून फिर्यादीच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यात अभिमन्यू कंटेनरच्या उजव्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला.
------------------
बालिकेवर अत्याचार करणार्या वृद्धाला अटक
भोसरी : दापोडी येथे मंगळवारी दुपारी 60 चर्षांच्या एका वृद्धाने 7 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केला.
त्या बालिकेच्या आईने या प्रकरणी भोसरी पोलीसठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी करीम कादर खान (वय 60 रा. दापोडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्याच्या 7 वर्षांच्या मुलीला आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवले. तिला तो स्वतःच्या घरी घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केला.हा प्रकार मुलीने आईला सांगितल्यावर आईने पोलिसात तक्रार दिली.
------------------------------
मोशी येथे वेश्याव्यवसायावर छापा
मोशी : मोशी प्राधिकरण येथे एका स्पामध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी छापा घातला. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोशी प्राधिकरणयेथील क्राऊन स्पामध्येव वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने तेथे छापा घातला. यावेळी तेथे 4 महिला देहविक्रय करत असल्याचे दिसून आले.
या प्रकरणी स्पा मॅनेजर खतिजा मोजिब खान (वय 21, रा. भोसरी), मालक अजय अरुण वाळके (वय 32, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------------
संकलित गुन्हे वृत्त दि.21 सप्टेंबर 2022
Reviewed by ANN news network
on
९/२१/२०२२ ०९:४०:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: