पोलिस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
पिंपरी : पिंपरी चिंचवड मधील मोहननगर चौकीत कामास असलेल्या अवघ्या 31 वर्षे वयाच्या पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
नंदकिशोर पतंगे असे मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. मागील एक वर्षापासून पतंगे पिंपरी पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते.
नंदकिशोर पतंगे यांना दोन दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले. त्यासाठी त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण, उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
पोलिस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Reviewed by ANN news network
on
९/२२/२०२२ ०४:५४:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: