स्वयंघोषित ’भाई’ अटकेत
रहाटणी : रहाटणी फाटा, काळेवाडी परिसरात शनिवारी रात्री सव्वाबारा वाजता दोघांना लुटणार्या एका स्वयंघोषित ’भाई’ पोलिसांनी अटक केली आहे. विशष म्हणजे हा ’भाई’ मोलमजुरी करून पोट भरत असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी संदेश रमेश गायकवाड (वय 30 रा. थेरगाव) याने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यावरून विकी रामप्रसाद मल (वय 42 रा.थेरगाव) याल पोलिसांनी अटक केली आहे.
शनिवारी रात्री सव्वाबारा वाजता फिर्यादी त्याच्या मित्रासोबत रहाटणी फाट्यावरील राजधानी हॉटेल जवळ थांबला असता आरोपी तेथे आला त्याने सिगारेट आहे का असे फिर्यादीला विचारले,तसेच फिर्यादीला तुम्ही कुठले आहात असेही विचारले. फिर्यादीने आम्ही इथलेच असे उत्तर दिले असता. मग तुम्ही मला ओळखता का असा प्रशन आरोपीने फिर्यादीला विचारला. फिर्यादीने नाही असे उत्तर दिल्यावर तुम्ही मला ओळखत नाही? मी या एरियाचा भाई आहे विकी मल भाई असे बोलून आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून फळीने आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली. आणि फिर्यादी व त्यांच्या मित्राकडील मोबाईल हिसकावून घेतले.
---------------------------------
आळंदीत महिलेचा विनयभंग
आळंदी : आळंदीतील धोडोपंत धर्मशाळेत गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास किर्तन ऐकायला आलेल्या महिलेचा एका व्यक्तीने विनयभंग केला.
या प्रकरणी त्या महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून नवनाथ कोरके (रा. धोडोपंत धर्मशाळा) याच्या विरोधात गुन्ह दाखल कऱण्यात आला आहे.
फिर्यादी धर्मशाळेत किर्तन ऐकण्यासाठी गेली असता आरोपीने त्यांना तू उमेश काळे व नारायण सूर्यवंशी व श्रीमंत सत्यवान यांची परवानगी न घेता इथे का आलीस असे म्हणत आरोपीने तिला अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केला. तू परत इथे आलीस तर 400 मुले आणून तुला ठार मारीन अशी धमकी दिली.
-----------------------------------
क्षुल्लक कारणावरून एकावर चाकूने वार
चिखली : चिखलीतील कृष्णानगर भाजीमंडई जवळ शुक्रवारी क्षुल्लक कारणावरून तिघांनी एकावर धारदार शस्त्राने वार केले. या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी कैलास दशरथ खाडे (वय 23 रा. चिखली) याने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून विनायक राजू ननवरे (वय 21 रा. चिखली) व दोन अनोळखी व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. यातील विनायक याला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादीला रिक्षाला हात लावू नको असे म्हणत आरोपींनी भांडणास सुरुवात केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली त्यानंतर फिर्यादीच्या हातावर व पोटावर चाकूने वार केले .
-----------------------------------
संकलित गुन्हे वृत्त दि.25 सप्टेंबर 2022
Reviewed by ANN news network
on
९/२५/२०२२ ०३:४०:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: