पिंपरी : मागील काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी लहान मुले पळविणारी टोळी सक्रीय झाल्याच्या बातम्या पसरत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पिंपरी चिंचवड परिसरात अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही. नाग्रिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिस आयुक्तालयाने केले आहे.
असा अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष किंवा जवळील पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेबाबत शहानिशा करून घ्यावी असेही पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
तसेच अशा प्रकारची माहिती अथवा संदेश मिळाल्यास नागरिकांनी पूर्ण खात्री केल्याशिवाय ते इतरत्र सोशल मीडीयाव्दारे प्रसारीत करू नये. अशा प्रकारच्या अफवा पसरविणार्या नागरिकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा या पत्रकात देण्यात आला आहे.
--------------------------
अफवांवर विश्वास ठेवू नका! : पोलिसांचे आवाहन
Reviewed by ANN news network
on
९/२५/२०२२ ०३:४३:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: