पूर्ववैमनस्यातून महिलेला मारहाण
शिरगाव : उर्सेगाव येथे रविवारी सकाळी भांडणाची तक्रार देण्यासाठी निघालेल्या महिलेला रस्त्यात अडवून सहाजणांनी मारहाण केली.
याप्रकरणी त्या महिलेने शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून दिली आहे. दिनेश केंडे, विक्रम केंडे, गणेश केंडे, इतर तीन अनोळखी व्यक्ती (सर्व रा. शिवणे, ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीच्या शेतात आरोपी गणेश याचा बैल आला. बैलाला बांधून ठेव असे फिर्यादीने त्याला सांगितले. त्यावरून आरोपी विक्रम याच्या वडिलांनी फिर्यादीस धमकी दिली.त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या सोबत शिवाजी गराडे, रुपाली गराडे, वसंत गराडे असे परंदवडी उर्से रस्त्याने मोटारीतून जात होते. त्यांच्या मोटारीतील डिझेल संपल्याने ते थांबले. त्यावेळी आरोपी दोन मोटारीतून आले. त्यांनी फिर्यादीसशिवीगाळ, दमदाटी केली.
आरोपी दिनेश याने निवृत्ती गराडे यांच्या मांडीवर लाकडी दांडक्याने मारून गंभीर दुखापत केली. विक्रम याने रुपाली गराडे यांना मारहाण केली.गणेश याने फिर्यादीस शिवीगाळ आणि दमदाटी केली.
----------------------------------------
महिलेचे गंठण हिसकावले
तळेगाव दाभाडे : चौराईनगर रोडवर, सोमाटणे येथे रविवारी सायंकाळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील गंठण चोरून नेले.
याप्रकरणीत्या महिलेने अनोळखी चोरट्याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी घराजवळ थांबली असताना दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने तिच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेले.
----------------------------------
सोन्याचे पेडंट लांबवले
चिंचवड : चिंचवड येथील पी. एन. गाडगीळ अँड सन्स या सराफी दुकानातून शनिवारी सायंकाळी अज्ञाताने 85 हजारांचे सोन्याचे पेंडंट चोरून नेले.
याप्रकरणी एका महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शनिवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास चिंचवड मधील पी. एन. गाडगीळ या सराफी दुकानात गेली होती. त्यावेळी अज्ञाताने तिचे 85 हजार रुपये किमतीचे सोन्याचे पेडंट चोरून नेले.
----------------------------------
देहूरोड येथे महिलेचा विनयभंग
देहुरोड : देहुरोड येथे 7 सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून तिचा विनयभंग करण्यात आला.
त्या महिलेने देहुरोड पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार केली.त्यावरून ईश्वर दरेकर (वय 34 रा. पुरंदर) व एक महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी देहुरोड येथील मैत्रिणीच्या घरी वाढदिवसासाठी आली होती. त्यावेळी आरोपी तेथे आले व त्यांनी सर्वांसमोर फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ केली. तिचा व्यवसाय बंद करण्याची व लग्न न होऊ देण्याची धमकी दिली.उपस्थितांसमोर अश्लिल हातवारे करून फिर्यादीचा विनयभंग केला.
----------------------------
संकलित गुन्हे वृत्त दि.27 सप्टेंबर 2022
Reviewed by ANN news network
on
९/२७/२०२२ ०५:०७:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: