पिंपरी : कासारवाडी नजिक वाहणार्या पवनानदीत बुधवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. सांगवी पोलिसांना नदीपात्रात मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविले. या विभागाच्या कर्मचार्यांनी मृतदेह नदीतून बाहेर काढला. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.
हा मृतदेह कासारवाडी स्मशानभूमिनजिक नदीमध्ये आढळला आहे. मृताचे वय सुमारे 35 वर्षे असून अंगात लाल रंगाचा शर्ट आणि निळी जिन्स आहे. पायात करड्या रंगाची पॅरेगॉनची चप्पल आहे. अंगावर कुठेही जखमा किंवा गोंदलेले नाही.मृत व्यक्ती दोन दिवसांपूर्वी पाण्यात बुडाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. कारण, मृतदेह माशांनी कुरतडला असून तो कुजण्यास सुरुवात झाली होती.
मृतदेह औंध रुग्णालयाच्या शवागारात पाठविण्यात आला आहे.
कासारवाडी : पवनानदीत मृतदेह आढळला
Reviewed by ANN news network
on
९/२८/२०२२ ०२:२७:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: