Police e news

बेपत्ता मुलींचा अवघ्या 4 तासात शोध लोणावळा ग्रामीण पोलिसांची कामगिरी

बेपत्ता मुलींचा अवघ्या 4 तासात शोध लोणावळा ग्रामीण पोलिसांची कामगिरी लोणावळा : येथील क्रांतीनगर, कुसगाव येथून शाळेत जातो म्हणून सांगून घराबाहेर पडलेल्या आणि त्यानंतर बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा तक्रार दाखल झाल्यापासून अवघ्या चार तासात शोधून सुखरूप ताब्यात घेण्यात लोणावळा ग्रामीण पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस तसेच उस्मानाबाद पोलिसांना यश मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दिनांक 03 सप्टेंबर रोजी रोजी रात्री 9 वा. सुमारास या बेपत्ता मुलींच्या वडिलांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार यांच्या अनुक्रमे 13 आणि 12 वर्ष वयाच्या दोन मुली ह्या राहत्या घरातून सकाळी साडेसात वाजता कन्या विद्यालय भांगरवाडी, लोणावळा येथे नेहमीप्रमाणे शाळेत गेल्या होत्या. परंतु दुपारी 2 वाजेपर्यत त्या परत न आल्याने पालकांनी शाळेत चौकशी केली. परंतु त्या शाळेत आल्या नसल्याचे शाळेतून कळविण्यात आले. पालकांनी मुलींचा आसपास शोध घेतला परंतू त्यांचा पत्ता न लागल्याने बेपत्ता मुलींच्या वडिलांनी रात्री 9 च्या दरम्यान लोणावळा ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक निलेश माने यांनी तात्काळ ही माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना कळवली. त्यानंतर वरीष्ठांच्या मार्गदशनाखाली लोणावळा विभागातील अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अमलदार यांची पथके तयार करुन तात्काळ तपासासाठी पाठविण्यात आली. दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक निलेश माने यांना या मुली सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास पुणे रेल्वेस्टेशनवर दिसल्याची माहिती मिळाली. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या मुली पनवेल नांदेड या रेल्वेने नांदेडकडे जात असल्याची माहिती मिळाली. पुणे ग्रामीण पोलिसांनी तात्काळ ही माहिती उस्मानाबाद अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांना कळवली. त्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास उस्मानाबाद रेल्वे स्टेशन येथे पोलीस रवाना केले. गाडी उस्मानाबाद रेल्वे स्टेशन येथे येताच पोलिसांनी दोन्ही मुलीचा शोध घेऊन दोघींना रात्री 1 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक निलेश माने यांनी दोन्ही मुली सुखरुप असल्याचे खात्री केली. त्यांना ताब्यात घेण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीसांचे पथक तात्काळ रवाना केले. त्यांनी आनंदनगर पोलीस स्टेशन, उस्मानाबाद येथून सकाळी 7 च्या दरम्यान दोन्ही मुलींना ताब्यात घेतल. त्या सुखरुप आहेत. कुठलाही धागादोरा नसताना, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अथक परिश्रम करुन अवघ्या चार तासामध्ये बेपत्ता मुलींचातपास लावून त्यांना सुखरूप ताब्यात घेतले.
बेपत्ता मुलींचा अवघ्या 4 तासात शोध लोणावळा ग्रामीण पोलिसांची कामगिरी बेपत्ता मुलींचा अवघ्या 4 तासात शोध लोणावळा ग्रामीण पोलिसांची कामगिरी Reviewed by ANN news network on ९/०४/२०२२ ०७:२०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.