Police e news

मिठाई दुकानदाराने ग्रीनमार्शलला चोपले

मिठाई दुकानदाराने ग्रीनमार्शलला चोपले थेरगाव : थेरगाव येथील एका मिठाईच्या दुकानात प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यासाठी घुसलेल्या एका ग्रीनमार्शलला दुकानदार आणि त्याच्या मुलाने आणि त्याच्या मित्राने धरून चोपले. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी मारहाण झालेला ग्रीनमार्शल निलेश गणपत कांबळे (वय 39) याने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून हिंम्मतलाल भाटी, त्याचा मुलगा राम भाटी व रामचा मित्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे थेरगाव येथे लक्ष्मी स्वीट मार्ट नावाचे दुकान आहे. शनिवारी दुपारी फिर्यादी महापालिकेच्या कर्मचार्‍यांसोबत फिर्यादीने आरोपींकडे दुकानातील प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यासाठी मागितल्या. हिम्मतलाल याने त्या देण्यास नकार दिला. शिवीगाळ करून पथकातील कर्मचार्‍यांना धक्काबुक्की केली. पथक तेथून कारवाई न करत पुढील दुकानात गेले असता आरोपी तेथे आले आणि त्यांनी तुम्ही आमच्या दुकानात कारवाईसाठी आलातच कसे असे विचारून फिर्यादीच्या कानशिलात वाजवली. त्यानंतर त्याला चोप दिला. फिर्यादीने त्यानंतर वाकड पोलीसठाण्यात जाऊन तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. -----------------
मिठाई दुकानदाराने ग्रीनमार्शलला चोपले मिठाई दुकानदाराने ग्रीनमार्शलला चोपले Reviewed by ANN news network on ९/०३/२०२२ ०३:४२:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.