गोवंश सदृष्य मांस विकणारे अटकेत
मोशी : पुणे नाशिक महामार्गावर मोशी येथे रविवारी पहाटे सव्वापाच वाजता गोवंश सदृश मांस विकणार्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
आदिल रशीद शेख (वय 25, रा. रामवाडी, जि. अहमदनगर), रहमुद्दीन मेहबूब कुरेशी (वय 30, रा. माजलगाव, जि. बीड) अटक झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई श्रीकांत एनगुंदल यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी त्यांच्या ताब्यातील दोन मोटारीतून गोवंश सदृश्य मांस विक्रीसाठी वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मोशी येथे सापळा लावून दोन्ही मोटारी ताब्यात घेतल्या. त्यामध्ये गोवंश सदृश मांस आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
-----------------------
गोवंश सदृष्य मांस विकणारे अटकेत
Reviewed by ANN news network
on
९/१९/२०२२ ०२:४५:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: