देहूगाव : देहूगाव येथे शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास चारित्र्याचा संशय पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मृत महिलेच्या बहिणीने पोलिसात तक्रार दिली असून त्यावरून अतक करण्यात आलेल्या पतीचे नाव सोहन प्रभाकर साठे (वय 45 रा.देहुगाव) असे आहे.
रंजिता सोहन साठे (वय 39) असे मृत महिलेचे नाव आहे. तिला आरोपीने केवळ चारित्र्याच्या संशयावरून घरासमोरील रस्त्यावर बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये तिचा मृत्यू झाला. ही घटना देहुगाव येथे शुक्रवारी (दि.30) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
-----------------------------------
पतीने केलेल्या मारहाणीमुळे पत्नीचा मृत्यू
Reviewed by ANN news network
on
१०/०१/२०२२ ०२:०६:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: