वाकड चौकात डंपर उलटला
वाकड : वाकड चौक येथे सोमवारी दुपारी खड्डे चुकविताना एका डंपर चालकाचा डंपरवरील ताबा सुटल्याने डंपर रस्त्यात उलटला. यामुळे वाहतूक कोंडी झाली.
मुंबई बंगळुरू महामार्गावर वाकड चौकानजिक हा अपघात सुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडला. वाकड पोलीसचौकीनजिकच अपघात घडल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. दोन क्रेनच्या सहाय्याने नंतर हा डंपर हलविण्यात आला. भूमकर चौक ते वाकड चौक या टप्प्यात महामार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. ते अपघाताला निमंत्रण देत असल्याचा आरोप या रस्त्याने नियमीत जाणार्या काही नागरिकांनी केला असून हे खड्डे त्वरित बुजवावेत अशी मागणी प्रवासी करत आहेत.
फोटो- डंपर
----------------------
वाकड चौकात डंपर उलटला
Reviewed by ANN news network
on
९/१९/२०२२ ०४:४५:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: