लग्नाच्या आमिषाने फसवणूक
चिंचवड : लग्नाचे आमिष दाखवत एका महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यानंतर लग्न न करणार्या एका व्यक्तीवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2021 ते ऑगस्ट 2022 या कालावधीपर्यंत सुरू होता.
या प्रकरणी पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून कमलेश जैैसराव (वय 23, रा. सोनार चाळ, ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी फिर्यादीच्या मैत्रिणीचा भाऊ असून त्याने फिर्यादीची ओळख झाल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र लग्न न करता तिची फसवणूक केली.
लग्नाच्या आमिषाने फसवणूक
Reviewed by ANN news network
on
९/०३/२०२२ ०३:२८:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: