तळेगाव दाभाडे : सुदुंबरे गावानजिक सुधा नदीच्या पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एक कंटेनर रस्त्यावरून खाली उलटला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला.
तळेगावहून चाकणला जाणारा हा कंटेनर गुरुवारी सकाळी 7 च्या सुमारास सुदुंबरे येथील सुधा नदीवरील जुन्या पुलाजवळ पोहोचला. पुलाच्या जोडरस्त्यावर वळण घेताना चालकाचा अंदाज चुकला व त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रस्त्यावरून खाली खोलगट भागात उलटला.
सुदुंबरे नजिक कंटेनर उलटला
Reviewed by ANN news network
on
९/२९/२०२२ ०१:२५:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: