विवाहितेचा छळ; सासरच्या पाच जणांवर गुन्हा
पिंपरी : खराळवाडी, पिंपरी येथे एका विवाहितेचा सासरच्यांनी मानसिक व शारीरिक छळ केला. हा प्रकार मार्च 2021 ते 29 ऑगस्ट 2022 या कालावधीत घडला.
याप्रकरणी त्या विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सासरे अशोक सखाराम चव्हाण (वय 64), पती आकाश अशोक चव्हाण (वय 32), दीर आतिश अशोक चव्हाण (वय 31), तसेच सासू (वय 50) आणि नणंद (वय 30, सर्व रा. खराळवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी फिर्यादी यांना तुला स्वयंपाक व घरातील इतर कामे नीट करता येत नाहीत, असे म्हणत वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. फिर्यादीला नाष्टा आणि जेवणाकरिता शिळे अन्न दिले. दुपारचे जेवण दिले नाही. तसेच, उपाशीपोटी ठेवून फिर्यादीचा मानसिक व शारीरिक छळ केला.
विवाहितेचा छळ; सासरच्या पाच जणांवर गुन्हा
Reviewed by ANN news network
on
९/०३/२०२२ ०३:२६:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: