Police e news

किरकोळ गुन्हे वृत्त दि.०५/०९/२०२२

किरकोळ गुन्हे वृत्त
वाहनचालकाने चोरले गोदामातील भंगार चिखली : पाटीलनगर, चिखली येथे एका भंगार व्यावसायिकाकडे वाहनचालक म्हणून काम करणार्‍या व्यक्तीने मालकाच्या गोदामातील सुमारे दोन लाख रुपयांचे भंगार चोरून नेले. या प्रकरणी अब्दुल जलील अन्सारी (वय 43, रा. पाटीलनगर, चिखली) याने शनिवारी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यावरून मयूर सुशील पाटील (वय 26, रा. पाटीलनगर, चिखली आणि अजय कांबळे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मागील एक महिना घडत होता. फिर्यादीचे पाटीलनगर, चिखली येथे सना कार्पोरेशन नावाचे गोदाम आहे. आरोपी मयूर फिर्यादीकडे वाहन चालक म्हणून काम करत असून तो आणि त्याचा मागील एक महिन्यापासून साथीदार असलेला अजय कांबळे या दोघांनी मिळून गोदामातील 2 लाख रुपये किमतीचे 3 टन 800 किलो भंगार चोरून नेले. --------------------- गांजा विकणारी महिला अटकेत निगडी : पेरूची बाग, ओटास्कीम, निगडी येथे शनिवारी दुपारी एका गांजा विकणार्‍या महिलेस पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलीस हवालदार सतीश जालिंदर ढोले यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओटास्कीम निगडी येथील पेरूची बाग येथे एक महिला गांजा विकत असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शनिवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास तेथे जाऊन एका घरावर छापा घातला. त्यावेळी तेथे पोलिसांना 2 किलो 120 ग्रॅम गांजा आढळला. त्याची किंमत सुमारे 53 हजार रुपये आहे. याशिवार 200 रुपये रोख रक्कमही यावेळी जप्त करण्यात आली. ----------------------------- बनावट कपडे विकणार्‍या दुकानदारांवर गुन्हा दाखल पिंपरी : नामवंत कंपन्यांच्या नावाखाली बनावट कपड्यांची विक्री करणार्‍या शहरातील 4 कापड दुकानदारांवर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलेश राजेंद्रप्रसाद यादव (वय 42, रा. काळेवाडी), अब्दुल हन्नान मेहंदी मन्सुरी (वय 40, रा. काळेवाडी) राजेश भगवानदास लालचंदानी (वय 45, रा. पिंपरी), शफिक गुलमोहम्मद शेख (वय 45, रा. काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सिद्धेश सुभाष शिर्के (वय 29, रा. मुंबई) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीची कपड्यांची कंपनी आहे. त्याच्या कंपनीचे बोधचिन्ह वापरून आरोपींनी कपडे विकले. याबाबत माहिती मिळाली असता फिर्यादीने पिंपरी मधील एसपी ट्रेडर्स, खुशी ड्रेसेस, सत्यम कलेक्शन,नूर कलेक्शन या दुकानांमध्ये पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. ---------------------- पर्स हिसकावणार्‍यास नागरिकांनी पकडले चिंचवड : चिंचवड येथील विठ्ठल मंदिरानजिक शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास पादचारी महिलेची पर्स हिसकावून पळून जाणार्‍या चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी त्या महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अक्षय परमेश्वर लवटे (वय 22, रा.चिखली) याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर, त्याचा साथीदार सुनील मधुकर अर्जून (वय 25 रा. चिखली) हा पसार झाला आहे. फिर्यादी आपल्या पतीसह मित्राच्या घरी सत्यनारायणाच्या पुजेसाठी पायी चालले होते. समोरून आलेल्या दुचाकीवरील मागे बसलेल्या तरुणाने फिर्यादीच्या हातातील पर्स हिसकावली. यावेळी फिर्यादीने ती दुसर्‍या हाताने घट्ट धरली. त्यानंतर आरोपीने त्याच्या हातात असलेल्या धारदार शस्त्राने फिर्यादीच्या मनगटावर वार केला.आणि पर्स खेचून आरोपी पळून जाऊ लागले. काही अंतरगेल्यानंतर दुचाकीवरील चोरटा उतरून पळून जाऊ लागला. यावेळी फिर्यादी व त्यांच्या पतीने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडले. पर्समध्ये 5 हजार रुपयांचा मोबाईल, 1 हजार रुपये रोख व 1 हजार रुपयांची पर्स असा एकूण 7 हजार रुपयांचा ऐवज होता. -------------------------
किरकोळ गुन्हे वृत्त दि.०५/०९/२०२२ किरकोळ गुन्हे वृत्त दि.०५/०९/२०२२ Reviewed by ANN news network on ९/०५/२०२२ १०:४९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.