Police e news

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ सोमवारी रात्री दोनच्या सुमारास रस्त्यात उभ्या असलेल्या एका मालमोटारीवर एक इको मोटार मागील बाजूस आदळल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. आणि दहा जण जखमी झाले. त्यातील 6 ते 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना कामोठे येथील महात्मा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोंढावळे, ता. वाई नवी मुंबईतील कोपरखैराणेे,येथे निघालेल्या मारुती इकोमध्ये चालक आणि अन्य 15 प्रवासी होते. द्रुतगती मार्गावर माडप बोगद्याजवळ ही मोटार आली असता रस्त्याच्या कडेला पंक्चर झालेला टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या एक ट्रकला (केएA - 56 - 2799) मोटारीने मागून धडक दिली. या अपघातात मोटारीतील लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर (वय -24) व गणेश बाळू कोंढाळकर (वय -22, रा. कोंढावळे, ता. वाई, जिल्हा - सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. इतर जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. रात्री दोनच्या सुमारास घडलेल्या या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ खोळंबली होती. अपघात झाल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणेंसोबत डेल्टा फोर्स, लोकमान्य हॉस्पिटलच्या अ‍ॅम्बुलन्स, पळस्पे वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस, खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला आणि खालापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाळा कुंभार यांनी घटनास्थळाला भेट दिली. इको मोटारीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते.चालक अंकुश राजाराम जंगम (वय - 32) याने मार्गिकेची शिस्त न पाळता, भरधाव वेगाने मोटार चालवल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात; दोघांचा जागीच मृत्यू Reviewed by ANN news network on ९/०६/२०२२ १०:०३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.