Police e news

पिंपळे सौदागर येथे ’स्पा’ मध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा

पिंपळे सौदागर येथे ’स्पा’ मध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा पिंपळे सौदागर : साईचौक, जगताप डेअरी, पिंपळे सौदागर येथे मंगळवारी एका ’स्पा’ वर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा घातला. यामध्ये 5 महिलांकडून देहविक्रय करून घेणार्या स्पा मालक महिलेला आणि व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 13 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्पा चालक, मालक सीमा धोत्रे, (वय 37, रा. नवी सांगवी) व व्यवस्थापक रमेश साहीराम (वय 24, रा. मूळ जि. गंगानगर, राज्य राजस्थान) या दोन आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला वाकड पोलीसठाण्याच्या हद्दीत साईसागर प्लाझा, साईचौक, जगताप डेअरी, पिंपळे सौदागर येथील कॅसल नावाच्या ’स्पा’ मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. पथकातील कर्मचार्यांनी तेथे बनावट ग्राहक पाठवून माहिती बरोबर असल्याची खात्री केली. त्यानंतर तेथे छापा घातला. तेव्हा आरोपी पाच महिलांकरवी वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी आरोपींना अतककरून त्यांच्याकडून 5 हजार रुपये रोख, 140 रुपये किमतीचे इतर साहित्य, 8 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन असा एकूण 13 हजार 140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक प्रदीप सिंह सिसोदे, धैर्यशील सोळंके, विजय कांबळे, पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, सुधा टोके, मारुती करचुंडे, भगवंता मुठे, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे यांनी ही कारवाई केली.
पिंपळे सौदागर येथे ’स्पा’ मध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा पिंपळे सौदागर येथे ’स्पा’ मध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा Reviewed by ANN news network on ९/०९/२०२२ ०३:१५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.