पनवेल : पनवेलनजिक खांदेश्वर येथे मुंबई पुणे द्रुतगतीमार्गावर एका ह्युंडाई कारने कंटेनरला मागून धडक दिली. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नसली तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे.
कर्नल बी. के. सक्सेना (वय 71वर्षे, रा. हडपसर पुणे) हे आपली ह्युंडाई कार क्रमांक एमएच 12 टीएन 5381 घेऊन पुण्याहून मुंबईकडे जात होते. खांदेश्वर परिसरात त्यांचा कारवरील ताबा सुटला.त्यांच्या कारने तिसर्या मार्गिकेवरून जाणार्या कंटेनर क्रमांक एमएच 46 एआर 4520 ला पाठीमागून धडक दिली. अपघाताचे वृत्त कळताच पळस्पे महामार्ग पोलीस केंद्रातील पोलीस उपनिरिक्षक गणेश बुरुकुल आणि कर्मचारी यांनी तात्काळ अपघाताच्या ठिकाणी जाऊन अपघातग्रस्त वाहन खाजगी क्रेनच्या साह्याने रस्त्याच्या कडेला घेऊन वाहतूक सुरळीत चालू केली.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कारला अपघात
Reviewed by ANN news network
on
१०/०१/२०२२ ०२:५१:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: