नवी मुंबई : पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केलेल्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील ४७१ पोलीस अंमलदारांच्या नवी मुंबई पोलिसांच्या आस्थापना मंडळाने अंतर्गत बदल्या केल्या आहेत. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.
यात पोलीस ठाणे, नियंत्रण कक्ष, पोलीस मुख्यालय, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, आरबीआय, अतिक्रमण आणि विशेष शाखेत कार्यरत पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तक तपासणीअंती पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केलेल्या ४७१ कर्मचाऱ्यांची यादी पोलीस आयुक्तालयातील आस्थापना मंडळाने तयार केली. त्यानंतर पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी त्यावर सह्या केल्या. यामध्ये श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई यांचा समावेश आहे. बदली झालेल्या अंमलदारांमध्ये १६ श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, १५ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, १४४ पोलीस हवालदार, ९४ पोलीस नाईक, १९७ पोलीस शिपाई त्याचप्रमाणे कसुरीवरुन बदली झालेल्या ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील ४७१ पोलीस अंमलदारांच्या बदल्या
Reviewed by ANN news network
on
१०/१६/२०२२ ०९:५८:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: