Police e news

कुसगाव येथे महिलेचा विनयभंग

कुसगाव : कुसगाव येथील वाघजाई वस्ती येथे शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजता हे माझे शेत आहे, तुम्हाला हात दाखवला तर कळत नाही का गाडी थांबवायला, असे म्हणत सहा जणांनी मिळून एक महिला आणि एका पुरुषाला मारहाण केली. याप्रकरणी त्या महिलेने रविवारी पोलिसात फिर्याद दिली असून त्यावरून बाबासाहेब गायकवाड, आतिष गायकवाड, सतीश ओव्हाळ व दोन ते तीन इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि त्यांचा मित्र कारमधून कुसगाव येथील वाघजाई वस्ती येथून शुक्रवारी रात्री जात होते. आरोपी बाबासाहेब गायकवाड याने फिर्यादी यांच्या कारला हात करून थांबवले. ‘हे माझे शेत आहे. तुम्हाला हात दाखवला तर कळत नाही का गाडी थांबवायला’ असे म्हणून फिर्यादीच्या मित्राला गाडीतून खाली उतरवत मारहाण केली. त्यानंतर बाबासाहेब याने त्याच्या मुलाला बोलावले. बाबासाहेब याच्या मुलाने आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्या मित्राला मारहाण केली.
कुसगाव येथे महिलेचा विनयभंग कुसगाव येथे महिलेचा विनयभंग Reviewed by ANN news network on १/०६/२०२२ १०:१२:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.