चिंचवड : कृष्णप्रकाश साहेब मला न्याय द्या, असे म्हणत बुधवारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात गोंधळ घालणा-या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अमित रामचंद्र गावडे (वय २८, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विश्वनाथ साठे मोहित भोसले (दोघे रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सुदर्शननगर येथे रस्त्यावर पार्क केलेल्या फिर्यादी यांच्या कारची आरोपी विश्वनाथ याने दारूच्या नशेत तोडफोड केली. फिर्यादी यांना दगडाने मारून जखमी केले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.त्यानंतर आरोपी विश्वनाथ याने पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन गोंधळ घातला.
पोलीस आयुक्तालयात गोंधळ घालणा-यावर गुन्हा दाखल
Reviewed by ANN news network
on
१/०६/२०२२ ०९:५४:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: