भोसरी : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून मार्च २०२१ ते २ जानेवारी २०२२ या कालावधीत तिच्यावर वारंवार अत्याचार करून त्याची चित्रफीत करत ती सार्वजनिक करण्याची धमकी देणा-या एका तरुणावर भोसरी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कमलेश दत्तात्रय वाळुंज (वय ३०, रा. स्पाईन रोड, भोसरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलीने मंगळवारी (दि. ४) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी कमलेश वाळुंज याने मार्च २०२१ ते २ जानेवारी २०२२ या कालावधीमध्ये रोशन गार्डन, अंकुशराव लांडगे नाट्यगृह समोरील पार्किंग, तसेच डुडुळगाव येथील लॉजमध्ये वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. ११ डिसेंबर रोजी डुडुळगाव येथील एका लॉजवर फिर्यादीला नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
लग्नाचे आमिष दाखवत मुलीवर अत्याचार
Reviewed by ANN news network
on
१/०६/२०२२ १०:१५:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: