पिंपरी : तळेगाव दाभाडे नजिक कातवी पुलाजवळ नदीपात्रात रविवारी एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्याचा खून झाल्याचे पोलीसतपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. गणेश सुनील सोनवणे (वय २४, रा. तळेगाव दाभाडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुद्राबाई लक्ष्मण सूर्यवंशी (वय ६५, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून किशोर जाधव (रा. तळेगाव दाभाडे) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह मिथिलेश भैय्या (दोघे रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी इंद्रायणी पात्रात कातवी उड्डाणपुलाजवळ एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासाअंती हा मृतदेह गणेश सोनवणे याचा असल्याचे समजले. गणेश याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. त्याला त्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. २२ सप्टेंबर रोजी तो कारागृहातून बाहेर आला होता. त्याला दारूचे व्यसन होते.अधिक तपास करता या प्रकरणाशी आरोपी किशोर आणि मिथिलेश यांचा संबंध असल्याचे दिसून आले त्यामुळे पोलिसांनी किशोर याला अटक केली. आरोपींनी कोणत्यातरी हत्याराने मृताच्या डोक्यात, छातीत आणि शरीरावर मारून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गणेशचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकला; अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
‘त्या’ खून प्रकरणातील एक आरोपी अटकेत
Reviewed by ANN news network
on
१/०६/२०२२ १०:१७:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: