भोसरी : भोसरी येथील एक मोबाईल विक्रीचे दुकान फोडून चोरट्यांनी ५५ लाख रुपये किंमतीचे २२२ मोबाईल फोन चोरून नेले. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. प्रभू रतनलाल भाटी (वय ३२, रा. नेवाळेवस्ती, चिखली) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी भाटी यांचे भोसरी येथे एम आर सूर्या इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाचे मोबाईलचे शोरूम आहे. सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांनी शोरूम बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी शोरुमच्या छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. आणि ५५ लाख १२ हजार ६४२ रुपये किमतीचे २२२ मोबाईल फोन चोरून नेले. फिर्यादी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला.
भोसरीत मोबाईल विक्रीचे दुकान फोडले
Reviewed by ANN news network
on
१/०६/२०२२ ०९:५०:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: