Police e news

पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली

तळेगाव दाभाडे : शहरातील दाभाडे एमरॉल्ड पासून मोहननगरकडे जाणा-या रस्त्यावरून ४ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता मुलीला शिकवणीमधून घरी घेऊन जाणा-या पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्याने हिसकावून नेली. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.फिर्यादी या त्यांच्या मुलीला ट्यूशनवरून घरी घेऊन जात होत्या. सायंकाळी सात वाजता दाभाडे एमरॉल्डपासून मोहननगरकडे जात असताना पाठीमागून चालत आलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील ७० हजार रुपयांची सोन्याची साखळी हिसकावून अंधाराचा फायदा घेऊन झाडीत पळ काढला.
पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली Reviewed by ANN news network on १/०६/२०२२ १०:२७:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.