Police e news

गांजा विकणारी महिला अटकेत

पिंपरी : ओटास्कीम, निगडी येथे गुरुवारी पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने गांजा विक्री प्रकरणी एका महिलेला अटक केली. तिच्याकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी २६ वर्षीय महिलेला अटक केली आहे. तिला विक्रीसाठी गांजा पुरवणारा आबा पवार (वय ४०, रा. ओटास्कीम, निगडी. मूळ रा. जामखेड, अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी आरोपी महिला गांजा विकताना आढळून आली. तिच्याकडून एक लाख ४६ हजार ७५० रुपये किमतीचा पाच किलो ८७० ग्रॅम गांजा जप्त केला. --
गांजा विकणारी महिला अटकेत गांजा विकणारी महिला अटकेत Reviewed by ANN news network on १/०७/२०२२ ०९:१५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.